loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली वाघमळा, वानोशी कुडासे येथे चोरट्यांचा डल्ला; रोकडसह लाखोंचे दागिने लंपास

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. सासोली वाघमळा येथील सुमन गणपत देसाई, कुटुंब घरात नाही हे हेरून घराची कौले काढून आत प्रवेश करून कपाट तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले पण आठ हजार रुपये हाती लागले नाही. तर दोन किलोमीटर अंतरावर कुडासे वानोशी दसर्ईवाडी येथे सत्यवान देसाई हे मुंबई येथे गेले हे लक्षात घेऊन त्यांचे घर फोडले पण कपाटातील लाॅकर उघडू न शकल्याने रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने सुरक्षित राहिले. दिड लाखांचे दागिने चोरून नेण्यास चोरटे यशस्वी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रविवारी श्वान पथक, ठसे तंज्ञ, मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन दाखल झाले. श्वान पथक याने घरापासून दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या फार्म हाऊस तसेच पार्टी करण्यासाठी जंगलात घातलेला माटव पर्यंत मार्ग दाखवला या चोऱ्या मुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ माजली आहे. वाढत्या चोऱ्या रोखणे दोडामार्ग पोलिसांसमोर आव्हान आहे.

घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. दरम्यान, सासोली-वाघमळा परिसरात झालेल्या या धाडसी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg