loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेचे उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर यांच्या दणक्याने भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदाई केलेल्या रस्त्याची अखेर दुरुस्ती

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी ते पवारसाखरी मार्गावरती महावितरणचे भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. या भूमिगत वीज वाहिन्या टाकताना रोड क्रॉसिंग करताना खोदाई करुन ठेवलेली आहे. या खोदाईमध्ये अनेक अपघात होत असून महावितरण कंपनी व भूमिगत वीज वाहिनी टाकणारा ठेकेदार एखाद्या मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे की काय? अशी प्रतिक्रिया व संताप नागरिकांमधून येत होती. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप तालुकाध्यक्ष अमित खांडेकर यांनी याची दखल घेत संबंधित ठेकेदार व महावितरण कंपनीला चांगलाच दणका देत मोबाईलद्वारे विचारणा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संबंधित कंत्राटदाराला या कामांचा जाब विचारला असता कंत्राटदार उडवा-उडवीची उत्तर देत होता. अखेर महवितरण कंपनीचे अधिकारी यांनी वस्तुस्थितीचा विचार करून याची जबाबदारी घेऊन लगेचच संबंधित ठेकेदाराला याबाबतच्या सूचना केल्या. रोड क्रॉसिंग करताना खोदाई करुन ठेवलेल्या रस्त्यांवर काँक्रिटीकरण करुन रस्ता व्यवस्थित करुन दिला आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महवितरण कंपनीचे अधिकारी यांचे आभार मानले, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर यांचे तेथील नागरिक तसेच या मार्गावरील वाहन चालकांमार्फत अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg