loader
Breaking News
Breaking News
Foto

कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, मुबंई या मातृसंस्थेच्या वतीने शाहीर शाहिद खेरटकर यांना कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ प्रदान

आबलोली (संदेश कदम) - कोकणातील लोककला आणि लोककलावंतांसाठी सातत्याने सक्रीय असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असणारे शाहीर, कवी, निवेदक, वक्ता आणि शाहीर शाहिद खेरटकर यांना कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई या मातृ संस्थेच्या वतीने नुकतेच भारतरत्न लताताई मंगेशकर नाट्यगृह, मीरारोड मुंबई येथे संपन्न झालेल्या बहारदार पुरस्कार वितरण सोहळ्यात कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कलगी तुरा या कोकणच्या लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी गेली ६५ वर्षे कार्यान्वीत असलेली नोंदणीकृत संस्था म्हणजे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई होय. अवघ्या कलगी- तुरा विश्वातील लोककलावंत, शाहीर या संस्थेला मातृसंस्था म्हणून-संबोधतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर मातृसंस्थेच्या वतीने गौरी-गणेश नृत्य स्पर्धांचे आयोजन मुंबई नगरीत करण्यात आले होते. याच स्पर्धेच्या औचित्याने कोकणातील नामवंत शाहिरांचा तसेच आयोजक व काही पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाहिद खेरटकर यांचे लोककलेतील योगदान सर्वश्रुत आहेच त्यापलीकडे त्यांनी साहित्यिक, वैचारिक दृष्ट्या देखील स्वतःची प्रतिभा सिद्ध केलेली आहे. भारतीय संविधान, लोकशाही आणि समाजव्यवस्था या प्रश्वभूमीवर त्यांनी आपल्या लेखणीतून, गायनातून तसेच वक्तृत्वातून केलेले समाजप्रबोधन वर्तमान काळात अधोरेखित करण्यासारखे आहे. आपल्या वर्तनातून समतेचा, मानवतेचा विचार अधिक प्रगल्भ करणारा शाहीर म्हणून त्यांची ओळख आहे. आजवर शाहिद खेरटकर यांना काव्यरत्न, कलारत्न, शाहिरीरत्न, समता भूषण, मराठा भूषण, लोककला प्रबोधन पुरस्कार यासहित असंख्य पुरस्कारांनी वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी सन्मानित केले आहे.

टाईम्स स्पेशल

परंतु सदरचा पुरस्कार कलगी तुरा या लोककलेतील मातृसंस्था समजल्या जाणार्‍या संस्थेने दिलेला पुरस्कार हा आपल्यासाठी विशेष असल्याचे शाहिद खेरटकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. पुरस्कार वितरण प्रसंगी सामाजिक, राजकीय तसेच लोककला क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वाची उपस्थिती होती. शाहिद खेरटकर यांना शाहिरी पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg