loader
Breaking News
Breaking News
Foto

कणघर ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत तपासणी

रायगड - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कणघर ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध विकासकामांची जिल्हा परिषद रायगड व ग्रामविकास मंत्रालयाच्या पथकाकडून सविस्तर तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान ग्रामपंचायतीने अंमलात आणलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन चालू असलेल्या कामांची कामगिरी, पारदर्शकता तसेच निधीच्या योग्य वापराबाबत पथकाने माहिती संकलित केली. ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक कागदपत्रे, नोंदी आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी यासाठी सक्रिय सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामविकास उपक्रमांचे प्राथमिक अहवाल समाधानकारक असल्याचे पथकाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले असून पुढील कामांना गती देण्याचा सल्लाही देण्यात आला. तपासणीदरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने सादर केलेल्या नोंदी, कागदपत्रे, प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी माधव जाधव उपस्थित राहून त्यांनी ग्रामपंचायतीने सातत्याने केलेल्या कार्यपद्धतीची, पारदर्शकतेची आणि विकासकामांतील प्रामाणिकतेची विशेष प्रशंसा केली. माधव जाधव यांनी विशेषतः गावातील जलव्यवस्था, स्वच्छता उपक्रम, मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविलेल्या उपक्रमांचे योग्य नियोजन, तसेच ग्रामपंचायतीने लोकसहभागातून साध्य केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. त्यांनी असेही नमूद केले की “कणघर ग्रामपंचायत ही विकासाला प्राधान्य देणारी आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत आदर्श ठरणारी पंचायत आहे.”

टाइम्स स्पेशल

अभियानातील विविध उपक्रमांचा प्राथमिक अहवाल समाधानकारक असल्याचे पथकाने सांगितले असून पुढील कामांना अधिक गती देण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रश्मी सावंत, उपसरपंच धनंजय सावंत, संतोष (नाना) सावंत, उल्हास सावंत, सुभाष चव्हाण, प्रगती धोकटे, मनस्वी इंदुलकर, अंजना भुवड, प्रकाश धाडवे, यशवंत सुर्वे, ग्रामसेवक शिंदे, ग्रामस्थ, महिला मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg