loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्णेश्वरी साडीचे कर्णेश्वर महोत्सवात दिमाखदार उदघाटन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - साडी हे वस्त्र त्या त्या भागातील सांस्कृतिक व भौगोलिक वारसा असतो. अतिप्राचीन काळात कोकणचे स्वतःचे अपरांतक नावाचे वस्त्र होते. त्यानंतर आज कोकण भूमीतील शिल्पसमृद्ध कसबा संगमेश्वर येथील श्री.कर्णेश्वर मंदिरावरची कला यांचा संपन्न वारसा सांगणारी कर्णेश्वरी साडी यांचे यावर्षीच्या चौथ्या महोत्सवात उदघाटन होत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन उदघाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) डॉक्टर आसावरी संसारे यांनी केली. कर्णेश्वर महोत्सवातील कर्णेश्वर साडीच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण सेंद्रिय कापूस व सेंद्रिय रंग वापरून सोळा रंगांमध्ये हातमागावर साकारलेली कर्णेश्वरी साडी हा कोकणचा नवा ब्रँड ठरेल, असा मला विश्वास असून, या भागात येणाऱ्या पर्यटकांना कर्णेश्वर महोत्सवात कर्णेश्वरी साडीची दिलेली भेट ही अभिमानास्पद आहे. असे उदगार यावेळी संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार अमृता साबळे यांनी काढले. साडी या वस्त्राचे सुबक काठ म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूचे समृद्ध काठ असून, साडीचा पदर म्हणजे नदीच्या उगमाची संपन्नता असते, दोन्ही काठांमधील वस्त्र हा संस्कृतीचा प्रवाहीपणा असतो. ते मत साडीचे उत्पादक धनंजय प्रभूघाटे यांनी व्यक्त केले. यावेळी विणकर ईश्वर धाबडी, तसेच ख्यातनाम अभिनेत्री संपदा जोगळेकर कुळकर्णी उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

यावर्षी विशेष म्हणजे महोत्सवाचे सर्व कलावंत व कार्यक्रमाचे प्रमुख यांना सह्याद्री आर्ट कॉलेज सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने आपली संस्कृती, कला व वारसा सांगणारी संगमेश्वर करणेश्वरची साडी खरेदी करावी, असे आवाहन श्री कर्णेश्वर देवस्थान व कलांगण संगमेश्वर यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg