loader
Breaking News
Breaking News
Foto

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड शहरात कार्यरत असलेल्या प्रख्यात एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट १९७६ रोजी या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली असून, २०२५ साली शाळेने आपल्या गौरवशाली ५० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाची औपचारिक सुरुवात १५ ऑगस्ट २०२५ रोजी गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आली. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कालावधीत शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन, सामाजिक जाणीव निर्माण करणारे सोशल सर्व्हिस कॅम्प तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत असून, हे कार्यक्रम शाळेच्या - शैक्षणिक परंपरेला अधिक बळ देणारे ठरत आहेत. या सुवर्ण महोत्सवी उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या खाद्य महोत्सवाला विशेष प्रतिसाद मिळाला. या खाद्य महोत्सवामध्ये तीन हजारांहून अधिक - विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली. यासोबतच कार्निव्हलचेही आयोजन करण्यात आले असून,विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी या उपक्रमांचा उत्स्फूर्त आनंद घेतला. या सर्व सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन प्रशालेच्या नवीन जागेत करण्यात आले आहे. खेड शहरालगत असणाऱ्या क्षेत्रफळ नगरजवळील प्रशस्त पटांगणात हे सर्व कार्यक्रम पार पडत असून, या नव्या परिसरामुळे कार्यक्रमांना अधिक भव्यता लाभत आहे. या उपक्रमांची सांगता १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य ङ्गग्रँड फिनालेफ कार्यक्रमाने होणार आहे.

टाइम्स स्पेशल

या सुवर्ण महोत्सवी ग्रैंड फिनाले कार्यक्रमाचे उद्घाटन १६ डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, १६ ते २० डिसेंबर या कालावधीत पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण होणार आहे. नृत्य, संगीत, नाट्य तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची प्रतिभा समाजासमोर मांडली जाणार आहे. १६ डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभासह माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या पाच दिवसीय सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांना शाळेचे विद्यमान विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच समाजातील सर्व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग यांनी केले आहे. संस्था अध्यक्ष अहमद भाई मुकादम, परवेज भाई मुकादम, माजीद शेठ लालू आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg