loader
Breaking News
Breaking News
Foto

ॲड.फजल डिंगणकर यांचा सत्कार

रत्नागिरी - गेल्या पिढीतील ज्येष्ठ वकील ॲड मुसा डिंगणकर यांचे चिरंजीव आणि दापोलीतील फौजदारी वकील खान यांचे जावई ॲड.फजल डिंगणकर यांना संपन्न वारसा लाभला आहे . साधा सरळ सज्जन माणूस, ॲड.फजल यांनी गेली पन्नास वर्ष यशस्वी वकिली केली .मोकळा स्वभाव , उमद मन आणि हसरा चेहरा लाभलेल्या फजल यांनी आपल्या सुस्वभावी कौशल्य यातून आपले समृद्ध व्यक्तिमत्व विकसित केले. ॲड.फजल यांच्या उपस्थितीने आमच्या बारचा सन्मान वाढला आहे. त्यांचा सत्कार करताना मलाच कृतकृत्य झाल्याची भावना आहे, असे उदगार रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.विलास पाटणे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी काढले. ॲड.सौ.रफीका डिंगणकर यांनी ॲड.फजल यांची मेहनत, सरळ स्वभाव यांचे कौतुक तर केलेच परंतु त्यांना सुयश चिंतिले . सत्कार सोहळ्याचे प्रस्ताविक व आभार ॲड.अवधूत कळंबटे यांनी केले. या प्रसंगी ॲड.प्रदीप परुळेकर , ॲड.विजय साखळकर, ॲड.राजशेखर मलूस्टे, ॲड.दिलीप धारिया, ॲड.शाल्मली अंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg