loader
Breaking News
Breaking News
Foto

विभागीय क्रीडा स्पर्धेत बोडदे जि.प. शाळेचा दबदबा; विविध स्पर्धांमध्ये पटकावले विजेतेपद

भेडशी (प्रतिनिधी) - शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत पार पडलेल्या केंद्र व विभागीय स्तर क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, बोडदे ता. दोडामार्ग येथील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले आहे. वैयक्तिक खेळांसह सांघिक खेळांतही शाळेने बाजी मारल्याने बोडदे शाळेचे नाव क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उंचावले आहे. क्रीडांगणावर आपल्या चपळाईने आणि कौशल्याने परीक्षकांची मने जिंकत विद्यार्थ्यांनी विविध क्रमांकावर मोहर उमटवली. यामध्ये 'ज्ञानी मी होणार'(मोठा गट) या प्रकारात सान्वी गुरुदास सावंत व श्रावणी गणपत गवस यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मैदानी स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे आणि लांब उडी प्रकारात गौतम सोरेन याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर गोळाफेक प्रकारात सर्वांग रामचंद्र गवस याने द्वितीय क्रमांक संपादन केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय, उंच उडी प्रकारात सान्वी गुरुदास सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. केवळ वैयक्तिकच नव्हे तर सांघिक खेळातही मुलींनी आपली चमक दाखवली. कबड्ड्डी (मुली) संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल साटेली विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी संदीप नाईक, बोडदे गावचे सरपंच हरिश्चंद्र नाईक, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक गोपाळ पाटील, मंजुश्री परब आणि महेश नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशासह आता हे विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg