loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणेनाका नातूनगर खवटी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या भरणे नाका नातूनगर खवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले. या घटनेनंतर भरणे नाका आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच परिसरातून एका कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ही घटना रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचेही ऐकावयास मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील गवळवाडी परिसरात तसेच नातूवाडी धरण परिसर, तुळशी फाटा परिसर हा बिबट्या दिसल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे भरणे नाका परिसरात या घटनेच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर नातूनगर धरणाचे पाणी कालव्याद्वारे नेण्यात आले असून, या कालव्यालगतच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. गवळवाडी परिसरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वनविभागाचे कार्यालय तसेच वनविभागाचा तपासणी नाका असतानाही या घटनेची अद्याप वनविभागाला ठोस माहिती नसल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून या बिबट्याला पकडण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस उपाययोजना करण्यात येणार? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे. वनविभागाने दखल घेऊन पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg