loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गातील 'त्या' वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणाचा निकाल लागला! चारही संशयितांची निर्दोष मुक्तता

भेडशी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर जमीन विक्री आणि बनावट दस्तऐवज प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप असलेल्या चारही संशयितांची दोडामार्ग न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. पी. बावकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, अनिल हेर्ले (रा. गारगोटी-कोल्हापूर, वारणा दूध संघ विक्री अधिकारी) यांनी दोडामार्ग येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. संशयित गौरेश सुधाकर टोपले (रा. साटेली भेडशी) याने हेर्ले यांना जमिनीबाबत माहिती दिली होती. त्यानंतर बाबा राजाराम देसाई (रा. कुडासे) यांची जमीन कुलमुखत्यार उदय सोमा गवस यांच्या माध्यमातून २६ जुलै २०१२ रोजी खरेदी करण्यात आली होती . जुलै २०२० मध्ये फिर्यादी अनिल हेर्ले यांनी जमिनीचा ऑनलाईन सातबारा काढला असता, त्यावर त्यांचे नाव नसून अजित वासुदेव नाईक-वेंगुर्लेकर आणि भारत वासुदेव नाईक-वेंगुर्लेकर यांची नावे दिसली. अधिक चौकशी केली असता, १२ जानेवारी २०१६ रोजीच ही जमीन मूळ मालकांच्या नावे अपडेट झाल्याचे समजले. तसेच खरेदीखतावेळी अनिल हेर्ले यांच्या जागी रमेश परब (रा. मडुरा) नावाच्या व्यक्तीला उभे करून हा बनावट व्यवहार केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, संशयितांतर्फे काम पाहणारे वकिल आणि त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गौरेश टोपले, परेश परब, संजय गावडे आणि मोहन गवस या चौघांचीही निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे ॲड. अनिल निर्वडेकर, ॲड. सोनू गवस, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. प्रीतेश गवस, ॲड. केतन जाधव आणि ॲड. वामन गवस यांनी काम पाहिले. त्यांचा युक्तिवाद न्यायालयाच्या निर्णयासाठी महत्त्वाचा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg