loader
Breaking News
Breaking News
Foto

मोडीलिपीचे अभ्यासक बाळुनाना बोंद्रे याचे वृद्धापकाळाने निधन

देवरूख सुरेश सप्रे ; देवरूखातील जुन्या काळातील मोडीलिपीचे अभ्यासक व जाणकार आत्माराम (बाळु नाना) यशवंत बोंद्रे ह्यांचे दि.०७ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पांढरा शर्ट - लेंगा, तोंडात साधी सुपारी, डोळ्यात आशावादी प्रेमळ भाव, हसरा चेहरा, मृदू शब्द, मनमिळाऊ स्वभाव, बोलण्याची तसेच माणसं जोडायची प्रचंड आवड, महसूल विभागाच्या कार्यप्रणालीची पूर्ण जाण असलेले मोडी लिपीचे अभ्यासक असलेले नाना या टोपन नावाने ओळखले जात होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्वीच्या काळात तलाठी म्हणून काम करत होते. नोकरीत असून ही मुळ गाव देवघर व देवरूखातील शेतीची कष्टाची कामे, परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी जोड म्हणून विमा, पोस्ट तसेच लॉटरी तिकिटांची एजन्सी, केस गळतीवर अभ्यास करून स्वत: तयार केलेलं तेल, शिकेकाई, घरची गावठी हळद व तिखट पावडर, घरच्या शेतात काबाडकष्ट करून काढलेल्या विविध भाज्या वगैरे मध्ये गुंतून अगदी ख-या अर्थाने अविरत कष्ट करीत राहिलेली ही व्यक्ती! आपल्या जिल्ह्यातील गावांत त्यांचा एवढा प्रचंड जनसंपर्क होता की गावातील वेगवेगळ्या घराण्यांतील व्यक्तींची एकंदरीत वंशावळच त्यांना ज्ञात असायची. १९५० पासून पहिली काही वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी नंतर जुन्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून अगदी सावंतवाडी पर्यंत जवळपास ७५ गावांत तलाठी म्हणून नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg