loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली तपासणी नाका पथकाची गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारु वाहतुकीवर मोठी कारवाई

बांदा (प्रतिनिधी) - गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक कारवाई करत मोठा साठा पकडला आहे. इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील तपासणी नाका पथकाने बांदा–दाणोली मार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. शनिवारी पहाटे सुमारे ६.४५ वाजता गोपनीय माहितीनुसार पथकाने बांदा–निमजगा जिल्हा परिषद शाळेसमोर वाहन तपासणी सुरू केली होती. यावेळी गोव्याहून आंबोलीकडे जाणारी पांढऱ्या रंगाची स्कोडा ऑक्टाविया कार (एमएच ०९ एएन ५००) थांबवून तपासण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील सीटखाली तसेच डिकीमध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या ५०४ सिलबंद बाटल्या आढळून आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही दारू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई केली. यामध्ये सुमारे २ लाख ८७ हजार २५० रुपये किमतीची दारू आणि सुमारे ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १० लाख ८७ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक प्रविण ईश्वरा जानवेकर (वय ५०, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गचे अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, वाहन चालक रणजीत शिंदे तसेच जवान दीपक वायदंडे, अभिषेक खत्री, सतीश चौगुले आणि सागर सूर्यवंशी सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg