loader
Breaking News
Breaking News
Foto

अक्कलकोट संस्थानमधून पहिल्यांदा बाहेर पडल्या श्री स्वामी समर्थाच्या पादुका

ठाणे (अमोल पवार) - श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्रीमंत मालोजीराजे भोसले द्वितीय यांना आपल्या पादुका भेट म्हणून दिल्या होत्या, त्या पादुकांचे दर्शन भाविकांना व्हावे म्हणून या पादुकांचे दर्शन परिक्रमण सोहळा आयोजित केला आहे. याची सुरवात रविवार ७ डिसेंबर रविवार पासून झाली आहे, अशी माहिती अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ता राजे भोसले तिसरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. प्रसिद्धी पत्रकात श्रीमंत मालोजीराजे तिसरे यांनी असे म्हटले आहे की, खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी तत्कालीन अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे द्वितीय यांना पादुका दिल्या होत्या त्या स्वामी पादुकांचे दर्शन भाविकांना व्हावे या हेतूने अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुका महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यात परिक्रमा करणार आहेत.या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ता राजे भोसले यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी अक्कलकोट येथील नवीन राजवाड्यातून सकाळी ११ वाजता या पादुका पहिल्यांदा परिक्रमासाठी पहिल्यांदा निघाल्या आहेत. परिक्रमेची सुरवात खंडोबा मंदिर नंतर श्री स्वामी समर्थ समाधी मठात येतील यानंतर ते सोलापूर मार्गी ८ डिसेंबर रोजी श्रीमंत छत्रपती गादी सातारा , ९ डिसेंबर रोजी फलटण गादी फलटण संस्थान, १० डिसेंबर मिरज संस्थान, येथे स्वामींच्या पादुका परिक्रमा करून गुरुवारी ११ डिसेंबर रोजी सांगली येथे पादुका भाविकांच्या दर्शनासाठी आल्या आहेत, पुढे मुधोळ, फोंडा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर या राज संस्थानासह पिंपरी चिंचवड, पुणे ,मुंबई, ठाणे आणि डोंबिवली आदी ठिकाणी भाविकांना स्वामींच्या पादुकाचे दर्शन घेता येणार आहे.

टाइम्स स्पेशल

कोकणात १४ ते १६ डिसेंबर रोजी स्वामीच्या पादुका परीक्रमा सोहळ्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भाविकांना स्वामींच्या पादुकाचे दर्शन घेता येणार आहे. फोंडा-शिवतीर्थ पॅलेस, नागेशिम, बांदोडा, फोंडा, गोवा. तारीख - १४ डिसेंबर २०२५ वेळ - सकाळी ९ ते रात्री ८. पणजी- श्री स्वामी समर्थ मंदीर, मेरशी-चिम्बंल रोड,मेरशी,गोवा, पणजी तारीख - १५ डिसेंबर २०२५ वेळ - सकाळी ९ ते रात्री ८, सावंतवाडी- राजवाडा दरबार हॉल, सावंतवाडी राजवाडा तारीख - १६ डिसेंबर २०२५ वेळ - सकाळी ९ ते रात्री ८.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg