loader
Breaking News
Breaking News
Foto

"संविधानावरील मिशन लोकशाही यशस्वी झाले" - शेखर भिलारे

आबलोली (संदेश कदम) - मला सांगायला अभिमान वाटतो की गुहागर तालुक्याने संपूर्ण महाराष्ट्रात "मिशन लोकशाही" या नावाने अभिनव उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमांमध्ये आपण हे सांगितलं होतं की, संविधान आपल्याला प्रत्येक घरात संविधान "हर घर संविधान" आपल्याला प्रत्येक घरात संविधान पोहोचवायचे होतं पण बऱ्याच ठिकाणी आपण प्रस्ताविका वाचली. पण गुहागर तालुक्यामध्ये दोन पावलं पुढे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवलं. विद्यार्थ्यांसोबत पालक सुद्धा संविधान शिकले. विद्यार्थ्यांची तयारी करत असताना संविधानाची ओळख पालकांनाही झाली. आणि आपण पहिली परीक्षा 26 नोव्हेंबरला केंद्र स्तरावरची घेतली. त्या परीक्षेला 3100 विद्यार्थी जवळपास बसले होते त्यातून काल 8 डिसेंबरला 345 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरची परीक्षा दिली आणि आपण ठरवल्याप्रमाणे अंतिम निकाल लागून आपल्याच तालुक्यातील प्रत्येक इयत्तेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवी 6 मुली,3 मुले, आणि 3 मुली अशी आपल्याला अंतिम 24 मुले सुद्धा मिळालेली आहेत. त्यामुळे प्रचंड आनंद वाटतोय. तीन महिने मी, माझा शिक्षक वर्ग, माझे पालक आणि माझे विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि काल त्याचे चीज झालं आज त्यांचे मार्क व त्यांचे मार्क बघितल्यानंतर समाधान वाटतं की, ह्या वयात एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी.च्या लेवलचा पेपर आपली मुलं सोडवतात आणि त्या परीक्षेत 90,88,84,86 असे मार्क ती मिळवतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानावरील "मिशन लोकशाही" यशस्वी झालं असं मला वाटतं असे स्पष्ट मत पत्रकारांशी बोलताना गुहागर पंचायत समितीचे कार्य तत्पर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी व्यक्त केले. गुहागर पंचायत समिती येथे आपल्या दालनात पत्रकारांनी भिलारे यांना विचारले की "मिशन लोकशाही" यशस्वी झालेय. विद्यार्थ्यांसाठी आणखीन पुढचं काय मिशन आहे तुमचं? या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना गटविकास अधिकारी शेखर भिलारे पुढे म्हणाले की, आजच जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत ते त्यांचे शिक्षक आणि पालक यांचा पंचायत समितीच्या वतीने छोटासा सत्कार समारंभ ठेवलाय त्याचबरोबर मिशन लोकशाही जेव्हा लाँच केली तेव्हाच आपण घोषित केलं होतं की चौथी, पाचवीच्या सिलेक्ट झालेल्या बारा मुलांना आपण मुंबई अभ्यास दौऱ्यावर नेतोय आम्ही सहावी, सातवीच्या बारा मुलांना आपण दिल्ली अभ्यास दौऱ्यावर नेतोय. 25 जानेवारीला आपण त्यांना दिल्लीला नेतोय. 26 जानेवारी ची देशाची प्रजासत्ताक दिनाची परेड आपण त्यांना दाखवतोय. त्यामुळे त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून आपण पंचायत समिती गुहागरच्या माध्यमातून त्यांना ही विशेष अभ्यास करण्याची सहल देतोय. आणि जी जे विद्यार्थी काठावर राहिलेत किंवा दोन मार्कांनी राहिलेत किंवा सेम मार्क होते पण लिमिटेड विद्यार्थी न्यायचे असल्यामुळे त्यांचे सिलेक्शन झालेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा एखाद्या विशेष अभ्यास दौऱ्याची नियोजन करण्याचा करत आहोत.

टाईम्स स्पेशल

तो एक्झेट अभ्यास दौरा कसा असेल याची आम्हाला आयडिया नाही आहे. पण आमचे सर्व शिक्षक, शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आंम्ही सर्वजण बसून येणाऱ्या काळात त्यासाठी विद्यार्थ्यांना भिंतीच फळ म्हणून त्यांनाही आम्ही एक विशेष अभ्यास दौरा म्हणून आयोजित करत आहोत. यानंतरही मिशन लोकशाही तसं संविधानावर आधारित केलेली आहे तसेच पुढे सुद्धा बाकी विषय घेऊन सुद्धा विविध मिशन या तालुक्यात राबवायचे आहेत याबाबत मगाशीच माझं सर्व शिक्षक वर्गाशी लग्न झालं. मला एक गोष्ट कळली की, या आपल्या तालुक्यामध्ये तुम्हीही नवोदय आणि स्कॉलरशिप या परीक्षांकडे आपल्या तालुक्याचा परफॉर्मन्स म्हणावा तसा नाही आहे. मुळे मला माझ्या शिक्षक वर्गांसोबत, मुख्याध्यापकांसोबत, केंद्रप्रमुखांसोबत एकत्र काम करून माझे विद्यार्थी नवोदय परीक्षेला आणि स्कॉलरशिप मध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात यश कसे मिळवतील यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत अशी माहिती सुद्धा पत्रकारांशी बोलताना गुहागरचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg