loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ स्कूलतर्फे महाड येथे “विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर” संपन्न

खेड (प्रतिनिधी) - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यू. कॉलेज (सी. बी. एस. ई.) वेरळ यांच्यामार्फत महाड (रायगड) येथे इ.१० वीच्या विद्यार्थांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते महाराष्ट्रातील प्रसिध्द भाष्यकार माधव अंकलगे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माधव अंकलगे यांनी आपल्या प्रखर व प्रभावी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर व सोप्या भाषेत परीक्षेच्या वेळेचे नियोजन, समजपूर्वक वाचन याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच दहावी नंतर योग्य करिअर‎ निवडणे हे विद्यार्थी आणि त्यांचे‎ पालक दोघांसाठी आव्हानात्मक‎ असते. परंतु त्यातून योग्य पर्याय कसा निवडावा याविषयी विशेष माहिती दिली. मान्यवरांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक प्रेरित झाले.

टाइम्स स्पेशल

तसेच विनोद सिंग, आदर्श गौरव, जास्मिन देसाई यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस. एस. अली, पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धी पलांडे व आभार प्रदर्शन जास्मिन देसाई यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg