loader
Breaking News
Breaking News
Foto

मिशन लोकशाही या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा रामानंद संप्रदायाच्या वतीने गौरव

आबलोली (संदेश कदम) - गुहागर पंचायत समिती व गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या मिशन लोकशाही या उपक्रमा अंतर्गत गुहागर तालुक्यातील सर्व शाळा मिळून जवळपास 3200 विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कौंढर काळसूर गुरववाडी या शाळेतील शरयू सचिन पाते, रुही महेश जोयशी, मनाली महेंद्र मूकनाक, श्रेया वसंत बामणे, अर्णव संजय बामणे, ऋषभ रामदास गिजे या सहा विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून पंचायत समितीच्या वतीने मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांनी भविष्यात अशाच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती करत रहावी यासाठी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रामानंद संप्रदाय सेवाकेंद्र कौढर यांच्या वतीने आज कौंढर काळसुर येते या मुलांना वही, पेन व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक सुभाष तांबे, विनेश तांबे तसेच रामानंद संप्रदायाच्या तालुकाध्यक्ष धनश्री मांजरेकर, घनश्याम मांजरेकर, मंगेश तावडे हे उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg