loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरळ येथील अनुग्रह विद्यालयातील विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास व रेल्वे स्टेशनचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम

खेड (दिलीप देवळेकर) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खेड क्लबच्यावतीने वेरळ येथील अनुग्रह विद्यालयातील विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास व रेल्वे स्टेशनचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला . यावेळी दिव्यांगांसाठी असणारा रेल्वेचा स्पेशल डब्बा, रेल्वेची व्यवस्था कामकाज दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. यावेळी अनुग्रह वेरळ येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर रेल्वे पाहतानाचा अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्लॅटफॉर्म वरील अनेक प्रवासी अनुभवत होते. यावेळी रेल्वे स्टेशन खेड येथे या विद्यार्थ्यांना लायस क्लबच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले .याच दरम्यान खेड रेल्वे स्टेशनचे अधिकारी श्री.नांदगावकर यांनी सुद्धा खाऊ वाटप केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये प्रवाशांना विद्यार्थ्यांनी वेगवेगळी गीते आणि पथनाट्य सादर करून दिव्यांगांच्या अंगी असणारे कला गुण दाखवण्याचा एक प्रयत्न सुद्धा अनुग्रह विद्यालय वेरळ येथील विद्यार्थ्यांनी केला. स्टेशनमधील प्रवाशांनी यावेळी मुलांचे कौतुक केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रमुख आणि माजी अध्यक्ष रोहन विचारे, ज्ञानदीप शिक्षण संस्था खेडचे अध्यक्ष अरविंदशेठ तोडकरी , माजी अध्यक्ष ओंकार गोंदकर, विवेक कदम , माजी खजिनदार प्रवीण पवार, ज्ञानेश्वर मरकड तसेच अनुग्रह शाळा वेरळ येथील शिक्षक वर्ग विद्यार्थी, रेल्वे स्टेशन खेडचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणारे प्रवासी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. यावेळी अनेकांकडून रोहन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg