loader
Breaking News
Breaking News
Foto

आयसीएस महाविद्यालयात अविष्कार संशोधन परिषद संपन्न

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि आय.सी.एस. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच 20 वी अविष्कार संशोधन परिषद (स्पर्धा) पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांची विभागीय फेरी होऊन यात पात्र विद्यार्थ्यांची निवड मुंबई येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी झाली. या परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 12 महाविद्यालयांतील 178 विद्यार्थी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुनिता शैलाजन यांनी अविष्कारमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला यांनी आपल्या महाविद्यालयाची निवड विभागीय स्तरासाठी केली त्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे आभार व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. शशीकुमार मेनन (डायरेक्टर, इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स रिसर्च इन इंटर डिसिप्लिनरी सायन्स) डॉ. सुनिता शैलाजन (रुईया कॉलेज माटुंगा, मुंबई), अविष्कारचे जिल्हा समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सहसमन्वयक डॉ. घनश्याम साठे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे आविष्कार समन्वयक डॉ. एस. के. घुमरे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. आर. एस. भालेराव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg