loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्पन्नाचा दाखला काढायला गेलेल्या अपंगास तलाठीकडून अपमानlस्पद वागणूक.

संगमेश्वर / सत्यवान विचारे. : तालुक्यातील भडकंबा गावचे रहिवाशी श्री, शैलेश बने (50)यांना दोन वर्षा पुर्वी अर्धांग वा्युचा ऍटक आल्याने त्यांची एक बाजू निकामी झाली आहे, त्यांचा एक हात आणि एक पाय हा पूर्णतः बधिर झाला असुन तसा त्यांच्याकडे 50% अपंगत्व असलेल्याचा संबंधित विभागाचा दाखला आहे. शैलेश बने यांना शासनाचे अपंगत्वाचे अनुदान मिळण्यासाठी तलाठी कार्यालया कडून उत्पन्नाचा दाखला हवा असल्याने ते मंगळवार ता,9 डिसेंबर रोजी भडकंबा तलाठी कार्यालयात गेले असता तेथील कार्यरत असलेले तलाठी अविनाश चोघुले यांनी त्यांना अपमानित करून हाकलून लावले असल्याचे शैलेश बने यांचे म्हणणे असुन तशी तक्रार बने यांनी देवरुखचे तहसीलदार यांच्याकडे लेखी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भडकंबा तलाठी यांनी एका अपंग व्यक्तीला अपमानित केल्याचे वृत्त गlवत पसरताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असुन आता या तलाठी महोदयांचे अणेक प्रताप समोर येत आहेत.हे महोदय गावात किंवा तालुक्याला राहत नसून हे कोल्हापूर एथून ये जा करीत असल्याची धक्का दायक माहिती समोर येत आहे.भडकंबा तलाठी सजा हद्दीत अणेक बेकायदेशीर धंदे सुरु असुन त्यामध्ये अवैध्य रित्या वाळू चिरा वाहतूक खुले आम सुरु असुन काही ठिकाणी दगड माती अनधिकृत रित्या उत्तखंनं करणाऱ्यांना यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.आता तर यांनी एका अपंग व्यक्तीचा अपमान करून यांनी माणुसकीला काळिमा फlसल्याचे बोलले जात आहे.आता या मुजोर तलाठी महोदयांवर कारवाई होऊन पीडित शैलेश बने यांना न्यायमिळतो का हे पाहावे लागणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg