loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्वाचा जल्लोष

पनवेल :- कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या आंतरशालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये प्रभावी कामगिरी सादर करत एकूण २४ विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले, तसेच या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, माझे स्वप्न, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त भारत, डिजिटल युगातील विद्यार्थी, जर मी नेता असतो अशा विषयांवर प्रभावी, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या विचारांची खोली व भाषणकलेची रचना पाहून उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्वाच्या व्यासपीठावर मिळवलेले हे यश सर्वांसाठी अभिमानाचे ठरले.

टाइम्स स्पेशल

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा खारघर महासचिव दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, उत्तर रायगड सचिव ब्रिजेश पटेल, खारघर उपाध्यक्ष किरण पाटील, अजित अडसुळे, सुरेश ठाकूर, दत्ता ठाकूर, अजय माळी, अश्विनी भुवड, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रवीण बेरा, सचिव आदित्य हाटगे, योगेश पाटील, मयूर घरत, यश पवार, अनिकेत पाटील, बंटी ढाकसे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg