loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या दिव्या पाल्येची महाराष्ट्र खो-खो संघात निवड

रत्नागिरी (जमीर खलफे) - कर्नाटक बंगलोर येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रत्नागिरीच्या दिव्या पाल्येची निवड झाली आहे. येत्या 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱ्या 44 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिव्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही निवड अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धे करण्यात आली आहे. निवड समिती सदस्य श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोळसे (बीड) व राखी जोशी (पुणे) यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संघाची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिव्या पाल्ये हिने यापूर्वी गया येथे शासनाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तिला राष्ट्रीय प्रशिक्षिक पंकज चवंडे व रा. भा. शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद मयेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल आर. ए. सोसायटीच्या शिल्पाताई पटवर्धन, सतिश शेवडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशन च्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

18 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा बेंगलोरला होणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg