loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसिद्ध उद्योजक सुरेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील उभरतं नेतृत्व, वारकरी संप्रदायाची गेली सात वर्षे अविरत सेवा करणारे कोकणचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक, लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संगमेश्वर - चिपळूण विधानसभा तसेच वडाळा विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश आत्माराम कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि. ८ डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरेश कदम यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी देवरुख परिसरातील त्यांचे समर्थक मार्लेश्वर चरणी ही अभिषेक रूपी सेवा करून प्रार्थना करणार आहेत. सकाळी ८ वाजता प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी तेथील भाविकांना फळवाटप केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वा. देवरुख येथील मातृमंदिर गोकुळ मधील अनाथ मुलींना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरेश कदम हे गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. कला-सांस्कृतिक क्षेत्रातील स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाच्या अडिअडचणीमध्ये साथ देवून त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे दिलदार व्यक्तिमत्त्व, स्वच्छ प्रतिमा, निःस्वार्थीपणा, वारकरी संप्रदायाचा गेली सात वर्ष वारसा जपणारे, शिवसेनेच्या खडतर काळात भगवा झेंडा खांद्यावर घेवून शिवसेनेला भक्कम उभारी देवून संघटना मजबूत करणारे कुशल संघटक, आपल्या शांत व संयमी स्वभावाने प्रत्येकाला आपलंसं करणारे, उदयास येणारं खंबीर नेतृत्व अशीही सुरेश कदम यांची ओळख आहे.

टाइम्स स्पेशल

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजिकच्या किरदाडी माळवाशी या गावातील वारकरी संप्रदायाला गेली सात वर्षे ते मोफत बस सेवा उपलब्ध करून देत आहेत .याच वर्षी त्यांनी किरदाडी माळवासी ते पंढरपूर अशा एकूण बारा एटी. बस. बस सोडून सुमारे पाचशे वारकऱ्यांना मोफत पंढरपुर वारी घडवून आणली. वारकरी संप्रदायाची अविरत सेवा करणारे सुरेश कदम यांना उदंड आयुष्य लाभो, अशी वारकरी संप्रदायाकडूनही परमेश्वराकडे या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करण्यात आली आहे. प्रतिवर्षा प्रमाणे याहिवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. सुरेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त देवरुख भागातील संतोष चाळके , महेंद्र नांदळकर, संतोष जाधव , सुनील करंडे , प्रकाश करंडे, बाळकृष्ण उबारे , संजय घाग, गजानन आंब्रे , प्रमोद पेडणेकर , दिनेश शिंदे ,गोविंद चाळके, नंदकुमार माने , रुपेश रेडीज, अशोक बने, संतोष बने यांच्यासह अनेक महिला पुरुष कार्यकर्ते मेहनत घेत असून सर्वांनी सोमवार दिनांक 8 रोजी ठीक 7 वाजता सावरकर चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg