loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील क्वालिटी प्रिंटर्सला भीषण आग

रत्नागिरी (वार्ताहर) : शहरातील एमआयडीसी परिसरातील क्वॉलिटी प्रिंटर्सच्या कार्यालयाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांची हानी झाली आहे. आगीत कंपनीच्या कार्यालयातील महत्त्वपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शनिवारी पहाटे एमआयडीसी परिसरातील क्वॉलिटी प्रिंटर्स कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आगीत कंपनीच्या वरच्या मजल्यावरील साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती वेळेवर मिळाल्याने तळमजल्यावरील साहित्य वेळेत हलवण्यात यश आले. आगीच्या या आगीत कंपनीतील कॉम्प्युटर्स, कपाटे आणि कागदपत्रे जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. या भीषण आगीवर मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस, अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे ही आग लागली असावी, असा कयास व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg