loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगांव येथे प्रथमच विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य असे कोकण फेस्टिव्हलचे आयोजन

वावेदिवाळी इंदापूर (गौतम जाधव) - आपल्या कोकणाचे मुख्य प्रवेशद्वार रायगडचे मध्यवर्ती ठिकाण माणगांव येथे शुक्रवार दिनांक १२ ते सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत विविध खाद्यपदार्थ आणि भरगच्च असा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीचा आनंद माणगांवसह रायगड, कोकण आणि महाराष्ट्रातील असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२२५ रोजी सांय ठिक ६.०० वाजता ढोल- ताशा पथकासह धूमधडाक्यात उद्घाटन होणार आहे. सदर उद्घाटन समारंभसाठी प्रमुख पाहुणे आणि ग्रेट सेलिब्रेटी सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री तसेच माहेची साडी फेम सौ.अलकाताई कुबल-आठवले तसेच चला हवा येऊ द्या फेम आणि सुप्रसिद्ध निवेदक, लेखक, दिग्दर्शक डॉ.निलेश साबळे, सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हे दि.१२ डिसेंबर रोजी माणगांव येथे होणार्‍या फेस्टिव्हला उपस्थित राहणार आहेत. तसेच या होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमाला माणगांवचे शिक्षण सम्राट व प्रमुख नेते ऍड.राजीव साबळे, नगराध्यक्ष श्रीमती.शर्मीला सुर्वे, माजी नगराध्यक्ष तसेच माणगांव प्रांत डॉ.संदिपान सानप, तहसीलदार, गट विकास अधिकारी, माणगांव न्यायालयातील न्यायाधीश तसेच माणगांव मधील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमात माणगांव, रायगड, कोकणसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणा-या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा विशेष सन्मान प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते केला जाणार आहे. सदर फेस्टिव्हलमध्ये शाळा व कॉलेजमधील विद्यार्थांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, काव्य वाचन, गीत गायन, अभिनय स्पर्धा, लावण्यवती स्वाती पुणेकर यांचा लावणी महोत्सव कार्यक्रम, बॉडी बिल्डींग, रेकॉर्ड डान्स आणि खास कोकण सुंदरी अशा अनेक स्पर्धा तसेच १४ भाषेत आणि ४५०० हुन जास्त विक्रमी प्रयोग केलेला कौटुंबिक विनोदी नाटक ऑद द बेस्ट, तसेच महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि हास्य टॉनिक भाऊ कदम यांचा सिरीयल किल्लर हा धमाल कौटुंबिक विनोदी नाटकसह अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची अस्सल मेजवाणी खास दर्दी व हौशी रसिक प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. तरी माणगांवात प्रथमच होणा-या या कोकण फेस्टिव्हल- २०२५च्या उद्घाटन सोहळ्यास शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सांय ठिक ६.०० वाजता रायगड कोकणातील सर्व प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य व सांस्कृतिक नातं जपणार व्यासपीठचे निमंत्रक व संस्थापक- अध्यक्ष डॉ.अजय आत्माराम मोरे आणि सेक्रेटरी सौ.सौ.अकिता मोरे तसेच कार्याध्यक्ष सौ.प्रमिला हितेन छेडा व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सुप्रसिध्द अभिनेञी अलकाताई कुबल, डॉ.निलेश साबळे यांची लाभणार उपस्थिती

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg