loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर भिंग फुटले; पतीनेच विषारी सापाचा दंश देऊन पत्नीची केली निर्घृण हत्या

मुंबई. राज्यात खळबळ उडवणारी एक घटना समोर आली आहे. पत्नीला विषारी सर्पदंश करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही हत्या पतीनेच सर्पमित्राच्या मदतीने घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तीन वर्षांनंतर या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पतीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पतीचे नाव रुपेश आंबेकर तर पत्नीचे नाव नीरजा आंबेकर होते.बदलापूर पूर्वेतील उज्ज्वलदीप अपार्टमेंट येथे निरजा आंबेरकर या त्यांच्या पतीसोबत राहत होता. त्यांना 10 जुलै 2022 रोजी सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती होती. त्या आधारे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तपासाने चक्रे फिरवून ही हत्या असल्याचे उघडकीस आणले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निरजा आंबेरकर यांच्या मृत्यूप्रकरणात सुरू असलेल्या तपासात आरोपी ऋषीकेश चाळके याने स्वखुशीने एक निवेदन दिले. तसेच त्याबाबत गुन्ह्याच्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच साक्षीदार हरिश घाडगे आणि दिपक वाघमारे यांनी याप्रकरणात जबाब दिले. यावरून आरोपीत ऋषीकेश चाळके, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि पती रूपेश आंबेरकर यांनी आपसात कट रचला आणि निरजा रूपेश आंबेरकर यांना सर्पदंश करून जीवे ठार मारले असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची खोटी माहिती देऊन गुन्ह्यातील पुरावे नष्ट केले आणि हत्येप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg