loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच अंध बांधवांसाठी मोबिलिटी प्रशिक्षण

वैभववाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि नाथ पै सेवांगण संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 07 व 08 जानेवारी 2025 रोजी लुई ब्रेल दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंध व्यक्तींसाठी दोन दिवशीय कार्यशाळेचे नाथ पै सेवांगण मालवण धुरीवाडा येथे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये अंध व्यक्तींना मोबिलिटी(चालणे, फिरणे) दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी पैसे ओळखणे, कडधान्ये ओळखणे,व इतर विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणाला ०७ तारीखला सकाळी ठीक ९:०० वाजता आपल्या कागदपत्रांसोबत उपस्थित राहणे आवश्यक आहे. या कार्यशाळेमध्ये एक निवास असणार आहे. आता या प्रशिक्षणासाठी मुंबई,पुणे येथे जाण्याची गरज नाही,तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आम्ही घेऊन येतोय मोबिलिटी प्रशिक्षण. या प्रशिक्षणाला शिक्षक, प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत.तर इच्छुक अंध व्यक्तींनी २५ डिसेंबर २०२५ पर्यंत नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संबंधित कागदपत्रे १) आधारकार्ड २) रेशनकार्ड ३) दिव्यांग प्रमाणपत्र ४)udid (स्वावलंबन कार्ड) ५) फोटो वयाची अट १८ ते ६०. अधिक माहितीसाठी संपर्क संस्थेचा नं. ९६२३६५५१४२, DDRC नं.९३२२०७३९९२, संस्था अध्यक्ष नं.९७६५९७९४५०, फोन करण्याची वेळ सकाळी १०:०० ते ५:००.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg