loader
Breaking News
Breaking News
Foto

निगुडे- रोणापाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते भरण्याचे काम सुरू

बांदा (प्रतिनिधी) : निगुडे रोणापाल मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदारांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला होता. यासंदर्भात निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता जी.एस.चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन सदर रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे साईड पट्टी साफसफाई तसेच रंगकाम सुरू करण्यात आले. पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले होते तसेच रोणापाल माऊली मंदिर या ठिकाणी मोठे वळण आहे या वळणावर मागे एसटी अपघात झाला होता. त्यामुळे खड्डा ही तो भरण्यात आला. यावेळी साईड पट्टी वगैरे व्यवस्थित करा असे ठेकेदार यांना बजावण्यात आले. यावेळी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, रोणापाल ग्रामस्थ, सुदीन गावडे, मंगेश गावडे, बाबल तुयेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg