loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग साॅ मिल संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद गवस यांची निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग साॅ मिल संघटनेच्या अध्यक्षपदी बांदा येथील आनंद गवस यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल संघटनेची वार्षिक सभा नुकतीच शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बांदा येथील आनंद विष्णु गवस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम देवजी पटेल (कुडाळ), सचिवपदी मंदार प्रभू (कुडाळ) आणि खजिनदारपदी अवधूत सतीश साळगावकर (साळगाव) यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद गवस यांनी येत्या काळात संघटनेच्या हितासाठी मी काम करेन, असे प्रतिपादन केले. दरम्यान, कार्यकारणी सदस्यपदी वासुदेव रामचंद्र नाईक (दोडामार्ग), संदीप अरविंद पटेल (कडावल), महेश नारायण पटेल (सावंतवाडी), काशीनाथ सतीश दुभाषी (सावंतवाडी), दयानंद शेणवी (वेंगुर्ला), संजय पटेल (मालवण), नितिन पांडुरंग दळवी (कुडाळ), सुमित पटेल (मालवण), किशोर पटेल (कणकवली), कांतिभाई पटेल (कणकवली), रामदास दळवी (कुडाळ) आणि सदाशिव परशुराम आळवे (कुडाळ) यांची निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg