loader
Breaking News
Breaking News
Foto

एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांचे संगमेश्वर तालुका 53 व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये घवघवीत यश

रत्नागिरी (जमीर खलफे) - द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक गटामध्ये सहभाग दर्शवला होता. या प्रदर्शनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना साजेसा व पर्यटनाला प्रोत्साहन देणार झूम झूम या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन विद्यार्थ्यांद्वारे बनवण्यात आले होते . एप्लीकेशन मधील कन्टेन्ट हा परीक्षकांना व प्रदर्शन पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून आवडला . ग्रामीण पर्यटनाला चालना देणारे एप्लीकेशन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये या एप्लीकेशनला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कुमारी मरियम राहील जुवळे व कुमारी सारा समीर मोडक या विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या प्रकल्पाची मांडणी परीक्षकांसमोर केली व त्यातूनच हे यश उत्पादन झाले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांच्या विचारातून घूम झूम हे ॲप्लिकेशन तयार झाले आहे व विद्यालयाच्या आयटी टीचर श्रीमती करीना वागळे यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे ॲप्लिकेशन तयार करणे शक्य झाले आहे. एप्लीकेशन तयार होत असताना संस्था अध्यक्ष सादिक काझी यांचे मोलाचेच मार्गदर्शन लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई या विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटामध्ये सहभाग दर्शवला होता. या प्रदर्शनासाठी तंत्रस्नेही प्रतिकृती तयार करण्यात आली होती. यामध्ये झोपाळ्यापासून वीज निर्मिती तयार करण्याची संकल्पना मांडली गेली व परीक्षकांना प्रतिकृती व संकल्पना मनापासून आवडली. सदर प्रतिकृती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सदर प्रयोगाला प्राथमिक गटामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कुमारी शरलीस तुलवे या विद्यार्थिनीने अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण केले. त्यामुळेच हे यश संपादन झाले आहे. तोफिक शेख यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शनामुळे सदर प्रयोग विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या सादर करता आला.

टाइम्स स्पेशल

एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्था अध्यक्ष सादिक काझी , उपाध्यक्ष डॉक्टर अन्सार जुवळे , सिकंदर जुवळे, सीमा मोडक , रिजवान कारीगर यांनी विजय त्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg