loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड तालुक्यातील पालवणे पंचक्रोशीत बिबट्याचा धुमाकूळ, दोन दिवसांत चार वासरांचा फडशा

खेड (प्रतिनिधी)- मंडणगड तालुक्यातील पालवणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असुन मागील दोन दिवसांत चार वासरांचा फडशा पाडल्यामुळे पालवणे विभागातील जनता भितीच्या छायेखाली वावरत असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मांगणी होत आहे. पालवणे धनगरवाडी येथील गरीब शेतकरी महेश हिरवे व नामदेव हिरवे यांची एकूण ४ वासरे बिबट्याने मारल्यामुळे पालवणे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व शेतकरी भयभीत झाले आहेत. दुग्ध व्यवसाय करून येथील शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चालवत आहेत परंतु बिबट्यांचा वावर पालवणे परिसरात दिवसेंदिवस वाढत असून गरिब शेतक-यांचा दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वनविभागाने पालवणे परिसरातून बिबट्यांना पकडून अन्य ठिकाणी पाठवून हा परिसर बिबटे मुक्त करून येथील गरीब शेतकरी बांधवांना न्याय देऊन सहकार्य करावे अशी स्थानिक नागरीकांची मांगणी आहे. लवकरच वनविभागाने बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच तर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

पालवणे परिसरात भितीचे वातावरण

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg