loader
Breaking News
Breaking News
Foto

विमानतळाला जोडण्यासाठी आणखी एक मेट्रो! ११ स्थानकांना जोडणार

राज्य सरकारकडून मंजुरीनंतर मेट्रो लाईन ८ चा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून, त्यात प्रस्तावित मार्ग आणि स्थानकांची माहिती दिली आहे. मानखुर्दहून वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर ही मेट्रो सायन-पनवेल महामार्गाला जोडेल. त्यानंतर नेरूळ, सीवूड्स, उलवे अशा भागांतून मार्ग जात थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचेल. एमएमआरडीएच्या ३३७ किमी मेट्रो नेटवर्कमध्ये आता मेट्रो ८ चा समावेश करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्वी हा प्रकल्प सिडको आणि एमएमआरडीएने संयुक्तरीत्या पूर्ण करण्याचे नियोजित होते. मात्र आता संपूर्ण अंमलबजावणीची जबाबदारी सिडकोकडे देण्यात आली असून, हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप मॉडेलवर राबवला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ २५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता असल्याने या भागातील वाढत्या वाहतुकीला हाताळण्यासाठी मेट्रो ८ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

टाइम्स स्पेशल

यामुळे मुंबईहून थेट छचखA विमानतळावर पोहोचणे सोपे होणार असून, दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवासही अधिक जलद होणार आहे. मेट्रो लाईन ८ साठी प्रस्तावित ११ स्थानके: वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ सेक्टर १, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, सागर संगम, तारघर/मोहा,A पश्चिम आणि छचखA टर्मिनल २ (एअरपोर्ट परिसरातील दोन स्थानकांसह). मानखुर्दहून नवी मुंबईत प्रवेश केल्यानंतर मेट्रो सायन-पनवेल महामार्गावरून वाशी, सानपाडा आणि जुईनगरमधून जाईल. नेरूळमधील एलपी जंक्शनपासून मार्ग आतल्या बाजूला वळत डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाजवळ एक प्रमुख स्थानक असेल. त्यानंतर नेरूळ-सीवूड्समार्गे मार्ग जात वंडर्स पार्कजवळील स्थानक, अपोलो हॉस्पिटल परिसर आणि एनएमएमसी मुख्यालयाच्या मागील भागातून उलवेसेकडे वळेल. सागर संगम आणि तारघर/मोहा स्थानके वेगाने वाढणार्‍या उलवे नोडला सेवा देतील. त्यानंतर ही मेट्रो विमानतळ कॅम्पसमध्ये प्रवेश करून पश्चिम आणि अंतिम टर्मिनल २ येथे थांबेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg