loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा मंडळ, रत्नागिरी सेवाभावी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाआरोग्य शिबिर

रत्नागिरी - मराठा मंडळ, माळनाका, रत्नागिरी ही नामवंत सेवाभावी संस्था आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे रत्नागिरी शहरात प्रथमच साधना फाऊंडेशन, मुंबई, आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालीटी हॅास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले जात आहे. रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी “ मराठा भवन “ या संस्थेच्या भव्य वास्तूत हे शिबीर होत असून मुंबईतील नामांकित डॅाक्टरांच्या टिमला पाचारण करण्यात आले आहे. अत्याधुनिक उपकरणांसह ही टिम रूग्णांच्या तपासण्या करणार असून, आजपर्यंत कोणत्याही आरोग्य शिबिरात न झालेल्या चिकित्सा व मार्गदर्शन या ठिकाणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये स्त्रीरोग चिकित्सा, नेत्र चिकित्सा, कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, अत्याधुनिक मशीन द्वारे हाडांची संभाव्य विकार तपासणी, जनरल फिजिशिअन, ईसिजी याचा समावेश आहे. याकरिता नागरिकांनी पूर्वनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. याकरिता ८०१०३०८८४६ या क्रमांकावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत नोंदणी करावी. रूग्णांनी येताना स्वतःचे जूने रिपोर्ट घेऊन यावे. शिबिराची वेळ सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.००. तरी जास्तित जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा मंडळ, माळनाका, रत्नागिरी या संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg