loader
Breaking News
Breaking News
Foto

“काडसिद्धेश्वर महाराजांवर आरोप सहन करणार नाही; विरोधकांना थेट इशारा” – सचिन आंब्रे

खेड - अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरोधात होत असलेले आरोप आणि गैरसमज खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा त्यांचे शिष्य तथा खेड पंचायत समितीचे माजी सभापती आणि उद्योजक सचिन उर्फ पप्पू शेठ आंब्रे यांनी दिला आहे. महाराजांबाबत कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरोधात भावना दुखावल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही व्यक्ती महाराजांवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप करत सचिन आंब्रे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. महाराजांविषयी समाजात चुकीचे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू असून तो कदापि सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

टाइम्स स्पेशल

महाराजांवर टीका किंवा अपप्रचार सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशाराही त्यांनी दिला. सिद्धेश्वर महाराजांच्या समर्थकांची भावना दुखावू नये, अन्यथा सांप्रदायिक शांततेवर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg