loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी येथे दिव्यांग विद्यार्थी व पालक उद्बोधन कार्यशाळा उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - दिव्यांग विद्यार्थी व पालक उद्बोधन कार्यशाळा पंचायत समिती सभागृह वैभववाडी येथे संपन्न झाली. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक वडर व गटसमन्यक विजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील विशेष गरजा असणा-या दिव्यांग विदयार्थ्याचे दिव्यांग समता सप्ताह निमित्त तालुकास्तरीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पालकांना समुपदेशन मार्गदर्शन व प्रेरणा मिळण्यासाठी पालक उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन केले होते. तसेच दिव्यांग विदयार्थ्यासाठी विविध स्पर्धा (फनी गेम्स) यांचे आयोजन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी ऋषिकेश जाधव, श्रीमती चंदना गावकर, अतुल जाधव व अभय पाटील यांच्या हस्ते लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सदर उद्बोधन कार्यशाळेसाठी डॉ.सचिन महेंद्रे, डॉ.मनिषा दळवी तसेच राहूल नांदूरकर यांनी उपस्थित पालक व विदयार्थी यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेतील सर्व विदयार्थ्यांना पारितोषिके देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg