loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या वराडकर – बेलोसे महाविद्यालयाच्या जीएस पदी कैलास उजाळ तर एलआर पदी रिया वैद्य यांची निवड

दापोली : वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोली येथील स्टुडंट कौन्सिल विभागाच्या वतीने महाविद्यालयातील जनरल सेक्रेटरी (जी.एस.) व लेडी रिप्रेझेंटेटिव्ह (एल.आर.) या महत्त्वाच्या पदांची निवड प्रक्रिया उत्साहात व पारदर्शक पद्धतीने पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीत विविध विभागांतील प्राध्यापक तसेच स्टुडंट कौन्सिल पदाधिकारी सहभागी होते. निवड प्रक्रियेसाठी महाविद्यालयातील विविध शाखा, एनएसएस, एनसीसी, आजीवन अध्ययन, सांस्कृतिक व क्रीडा विभागांकडून नामांकने प्राप्त झाली होती. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, महाविद्यालयीन व सहशालेय उपक्रमातील सहभाग, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि शिस्त या सर्व निकषांवर सखोल विचार करून निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडीत एनएसएस विभागातील टी.वाय. बी.ए.चे विद्यार्थी कैलास उजाळ यांची महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी (जीएस) पदासाठी निवड करण्यात आली. महाविद्यालयात एनएसएस स्वयंसेवक म्हणून काम करत त्यांनी विभागीय व विद्यापीठ स्तरावरील अनेक शिबिरांत व उपक्रमांत उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे. सातत्यपूर्ण सहभाग, नेतृत्वक्षमता, शिस्तबद्धता आणि सामाजिक कार्यातील बांधिलकी या गुणांच्या आधारावर त्यांची निवड सर्वानुमते झाली. तर टी.वाय. बी.कॉमची विद्यार्थिनी रिया वैद्य हिची लेडी रिप्रेझेंटेटिव्ह (एलआर) पदासाठी निवड झाली. एनएसएस स्वयंसेवक म्हणून तिची सक्रिय भूमिका, सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग, शैक्षणिक प्रगती तसेच विद्यार्थिनींमध्ये असलेली लोकप्रियता या सर्व गुणांच्या आधारे तिची निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी दोन्ही विद्यार्थी प्रतिनिधींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याणासाठी तसेच आगामी उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जीएस व एलआरकडून अपेक्षा व्यक्त केल्या.

टाइम्स स्पेशल

यानंतर महाविद्यालयाचा शिशिर युवा महोत्सव सुरू होणार असून या संपूर्ण महोत्सवाच्या नियोजन, समन्वय व अंमलबजावणीची जबाबदारी जीएस कैलास उजाळ व एलआर रिया वैद्य यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेजच्या मार्गदर्शक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव भव्यदिव्य पार पडेल, अशी माहिती प्राचार्यांनी दिली. महाविद्यालयीन लोकशाहीची आणि विद्यार्थीकेंद्रित प्रशासनाची ही प्रक्रिया महाविद्यालयासाठी गौरवास्पद ठरली असून या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg