loader
Breaking News
Breaking News
Foto

'एलटीटी' च्या माजी विद्यार्थ्यांचा १६ रोजी स्नेहमेळावा

खेड (प्रतिनिधी) - शहरातील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीटी इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ११ डिसेंबरपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील एलटीटी स्कूलच्या मैदानात माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रशालेचा सुवर्ण महोत्सव दिमाखात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशालेतून आजवर ४ हजाराहून अधिक माजी विद्यार्थी शासकीय सेवांसह देश-विदेशात कार्यरत आहेत. हे सर्व माजी विद्यार्थी १६ रोजी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. शिक्षकांशी संवाद साधत शालेय जीवनातील अनुभव कथन करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१६ ते २० डिसेंबरपर्यंत सलग ५ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांसह पारितोषिक वितरणांची रेलचेल राहणार आहे. नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचेच सायंकाळी गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. जिल्हास्तर कथाकथन, तालुकास्तर बुद्धिबळ, आंतरशालेय प्रश्नमंजुषा व आंतरशालेय नृत्य स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरवण्यात येणार आहे. जिल्हा, तालुकास्तरीय स्पर्धाचे बक्षीस वितरण, विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम विविध क्षेत्रात चमकलेल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, संस्थाध्यक्ष अहमद मुकादम, मंत्रालयातील अवधूत दरेकर, कन्साई नेरोलॅक कंपनीचे व्यवस्थापक जय वर्धन, सैनिकी स्कूलचे कमांडंट क्रिष्णन यादव आदी उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पुढील वाटचालीतील ध्येयधोरणेही जाहीर केली जाणार आहेत.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी संस्था सदस्य परवेज मुकादम, माजिद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक जी.बी.सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी.एस. कुडाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांसह पालकांनी तसेच हितचिंतकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg