loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत महायुतीत शिवसेना पक्षाला 125 जागां हव्यात , आग्रही मागणी

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 साठी महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवसेना (शिंदे गट) मुंबईत 125 जागा लढवण्यासाठी आग्रही असून, याबाबत कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या विकासावर भर देत कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख केला. त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मुंबई लुटल्याचा आरोप केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड होऊन मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो, असा दावा केला. तर प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. भाजपने आणि शिंदे गटाने हजेरी लावली असली तरी, अजित पवारांच्या पक्षाचा एकही आमदार उपस्थित नव्हता. मुनगंटीवार यांनी अजित पवारांचा गट स्वतंत्र पक्ष असल्याचे म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान शिंदे भाजप पक्ष सोबत अधिकच जवळ गेल्याचे दिसत आहे .आज त्यांनी नागपूर येथे संघ मुख्यालयाला भेट दिली , त्यामुळे दिवसभर याबाबत चर्चा सुरु आहे ,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg