loader
Breaking News
Breaking News
Foto

खावडी येथील तालुका विज्ञान प्रदर्शनात आश्रमशाळा जावडेच्या गणिती मॉडेलला दुसरा क्रमांक

लांजा ( वार्ताहर) :- पंचायत समिती शिक्षण विभाग व सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था मुंबई (खावडी) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा खावडी येथील ५३ व्या तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील मोठ्या शाळांनी लक्षणीय कामगिरी केली. माध्यमिक विभागात विद्यार्थी निर्मित विज्ञान प्रतिकृतीमध्ये लांजा हायस्कूलच्या मॉडेलने पहिला क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक सापूचेतळे हायस्कूलने प्राप्त केला. याच गटात खावडी हायस्कूलचे मॉडेल तिसरा तर भांबेड हायस्कुलच्या मॉडेलला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. उच्च प्राथमिक गटात विद्यार्थी निर्मित प्रतिकृतीमध्ये तळवडे केंद्रातील चिराग नंदकुमार पाटोळे या विद्यार्थ्याच्या मॉडेलला पहिला क्रमांक, रावारी केंद्रातील माध्यमिक आश्रमशाळा जावडेच्या विराज विनोद नांगरे याच्या संख्या रेषेच्या सहाय्याने पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी या गणितीय प्रतिकृतीने दुसरा क्रमांक, हर्दखळे केंद्रातील किरण रविंद्र पांचाळ याच्या प्रतिकृतीने तिसरा तर कोचरी केंद्रातील सालपे क्र.४ मधील अनन्या अजय कोटकर याच्या प्रतिकृतीस उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिव्यांग विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती माध्यमिक गटात अल अमीन ऊर्दू हायस्कूल लांजा येथील एफ.एम.मुन्शी या विद्यार्थ्याच्या मॉडेलला पहिला क्रमांक तर साटवली हायस्कूलच्या तेजल संतोष डांगे हिच्या सोलार कारला दुसरा क्रमांक देण्यात आला. दिव्यांग विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती प्राथमिक गटात लांजा कन्या केंद्रातील स्वस्तिका अनिल गुरुंग हिच्या पर्यावरण पूरक गोमय उत्पादने या प्रतिकृतीने पहिला तर हर्दखळे केंद्रातील राणी संतोष मोरे हिच्या रोटी मेकर मॉडेलला दुसरा क्रमांक देण्यात आला . शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्य प्रकारात माध्यमिक गटात श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुकच्या व्ही.वाय.बंडगर यांच्या क्लिनोमीटर मॉडेलचा पहिला क्रमांक आला. रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळच्या महेंद्र साळवी यांच्या कंपास एक किमयागार या प्रतिकृतीने दुसरा क्रमांक मिळविला. हर्चे हायस्कूलच्या ए.व्ही.गवळी यांच्या मानवी प्रजनन प्रतिकृतीने तिसरा क्रमांक प्राप्त केला.

टाईम्स स्पेशल

उच्च प्राथमिक गटात शिक्षकांनी बनविलेल्या प्रतिकृतीमध्ये सरस्वती विद्यामंदिर रिंगणेच्या संजय विठ्ठल कानसे यांच्या गणिताचा फळा व विळा मॉडेलने पहिला क्रमांक, केंद्रशाळा हर्दखळे येथील प्रकाश रामचंद्र बंडबे यांच्या विज्ञानाच्या दुनियेत मॉडेलने दुसरा,तळवडे हायस्कूलच्या श्वेता सावंत यांच्या मैत्री गणितीय नियमांशी मॉडेलने तिसरा क्रमांक मिळविला. प्रयोगशाळा परिचर व सहाय्यक यांच्या गटात न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज लांजा येथील मंगेश पुरात यांच्या DNA प्रतिकृतीने पहिला, सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज रिंगणे येथील संभाजी डवरी यांच्या सुरक्षित शोषनळी प्रतिकृतीने दुसरा, रा.सि.बेर्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साटवली येथील समीर नारकर यांच्या होलोग्राम प्रतिकृतीने तिसरा क्रमांक पटकावला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल वनगुळे येथील सूचित दिलीप तावडे व शताक्षी गजानन पांचाळ यांच्या गटाने पहिला क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक लांज्यातील राणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील पार्थ काशिनाथ घाणेकर व अभिनय भिमराव तेलंगे यांनी मिळविला तर तिसरा क्रमांक भांबेड हायस्कूलच्या विद्यार्थी वेदांत दिनेश गावडे व हर्षदा दत्ताराम बावदाणे यांच्या गटाने मिळविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg