loader
Breaking News
Breaking News
Foto

ऑडी कार आणि हार्ले डेव्हिडसन दुचाकीसह वाहतुक पोलिसांनी लावला १ कोटींच्या वाहनांचा छडा

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे शहर वाहतुक शाखेच्या नियमित तपासणीत वर्षभरात तब्बल १ कोटी रुपये किंमतीची १५ वाहने हस्तगत करण्यात पथकांना यश आले आहे. ०१ जानेवारी २०२५ ते ०९ डिसेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या या कारवाईत आलिशान ऑडी कार आणि हार्ले डेव्हिडसन या महागडया दुचाकीचाही छडा पोलिसांनी लावला आहे. हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांसोबत ताब्यात घेतलेल्या वाहन चोरांना संबधित पोलीस ठाण्यांच्या हवाली करण्यात आले आहे.अशी माहिती वाहतुक शाखेकडून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रातील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत एकुण १८ वाहतुक कक्ष कार्यरत आहेत. वाहतुकीचे नियमन तसेच वाहन तपासणी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा याकरिता वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते. ०१ जाने. २०२५ ते ०९ डिसे.२०२५ या कालावधीत वाहतुक पोलिसांनी केलेल्या वाहनांच्या तपासणीत तब्बल १५ चोरीच्या वाहनांचा छडा लावण्यात वाहतुक शाखेला यश आले आहे. या वाहनांमध्ये एक आलिशान ऑडी कार, महागडी हार्ले डेव्हीडसन दुचाकी तसेच १० दुचाकी आणि चार ऑटो रिक्षांचा समावेश आहे. १३ नोव्हे.२०२५ उल्हासनगर क्षेत्रात तपासणी दरम्यान हार्ली डेव्हिडसन ही महागडी दुचाकी हस्तगत करण्यात यश आले. वाहतूक पोलीस अंमलदार विष्णू शिंदे व वाहतूक वार्डन नरेश दळवी वाहतूक नियमन करीत असताना त्यांना जवाहर हॉटेलकडून फॉरवर लाईन चौकच्या दिशेने नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरून त्रिकूट येताना दिसले. कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांनी सदरची मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगताच वर्दळीचा फायदा घेऊन मोटरसायकल पोलीस अंमलदार यांच्या अंगावर ढकलून तिघेही जण अंबरनाथच्या दिशेने पळून गेले. त्यांनतर चेसीज नंबर द्वारे मोटर सायकल नंबर व मालकाची माहिती शोधून काढली. सदरची सुमारे साडेतीन लाखांची हार्ली डेव्हिडसन गाडी मुलुंड येथील कुणाल केणी यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाल्याने नवघर पोलीस ठाण्याकडे गाडी हस्तांतरीत करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

"वाहतुकीचे नियमन करीत असताना वाहतुक पोलीस कर्मचारी वाहनांसंबधीत कागदपत्रांचीही मागणी करतात. अनेकदा पोलिसांची ही सर्वकष तपासणी वाहन चालकांना डोकेदुखी ठरून जाचक वाटत असते. मात्र, प्रत्येक वाहन चालकाने हेल्मेट तसेच योग्य परवान्यासह आपण चालवित असलेल्या वाहनांशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे गरजेचे आहे, जेणेकरून तपासणी दरम्यान गैरसोईचे ठरणार नाही" , असे पंकज शिरसाट, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर वाहतुक विभाग यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg