loader
Breaking News
Breaking News
Foto

खावडी येथे आजपासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लांजा (वार्ताहर) :- पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे ५३ वे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सोमवारपासून (८ डिसेंबर) खावडी येथील श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळेत भरणार असून, यानिमित्ताने पुढील तीन दिवस खावडी येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था मुंबई (खावडी) या संस्थेच्या श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा खावडी या विद्यालयात ५३ वे विज्ञान प्रदर्शन भरणार आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यजमान सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेने स्वीकारले आहे. दि.८ ते १० डिसेंबर असे तीन दिवस तालुक्यातील विज्ञानप्रेमी नागरिक, शाळा व विद्यार्थी खावडी येथे एकत्र येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी ११ वाजता विज्ञान दिंडी निघणार आहे. त्यानंतर दिवसभर शाळा आपापल्या विज्ञान प्रतिकृती सादर करणार आहेत. मंगळवारी अकरा वाजता विज्ञान प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. लांजा राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

टाईम्स स्पेशल

यानिमित्ताने लांजा तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकारी खावडी गावात येणार आहेत. या विज्ञान महोत्सवासाठी सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश शिवराम कानडे, उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई, सचिव सुप्रिया कानडे, शाळा समिती अध्यक्ष आनंद देसाई, उपाध्यक्ष काशिनाथ शंकर गुरव, सदस्य यशवंत खानविलकर, अशोक गुरव, वसंत देसाई, खावडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दामिनी भिंगार्डे, खावडीच्या सरपंच मृणाली आंब्रस्कर खावडी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक मनोहर म्हादये यांच्यासह शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg