loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी करणे आवश्यक आहे. गुगल, चॅट जीपीटी, ए आय, जेमिनी, नोटबुक एल एम यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून व आधुनिकतेची कास धरावी, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायचा असेल तर पुस्तक आणि शाळा याबरोबरच या एप्लीकेशन्सचा वापर करता आला पाहिजे. असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश वालावलकर, गटशिक्षणाधिकारी कणकवली किशोर गवस, प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे, कणकवली कॉलेज प्राचार्य प्रा.महालिंगे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर, रामचंद्र नारकर, केंद्रप्रमुख संजय पवार, विजय भोगले, सूर्यकांत चव्हाण, कणकवली तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शरद चोडणकर, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, एस.एम. हायस्कूल मुख्याध्यापक बोडके, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, चंद्रशेखर पोकळे, लक्ष्मण वळवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख जे. जे. शेळके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अरुण चव्हाण यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्टपणे आयोजन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे व संस्थेचे कौतुकही केले. हे विज्ञान प्रदर्शन 9 डिसेंबर ते 10 डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. या प्रदर्शनात प्राथमिक गटात 44 व माध्यमिक गटात 20 प्रतिकृती ठेवण्यात आल्या व दिव्यांग गटात 5 प्रतिकृती ठेवण्यात आल्या. तसेच शिक्षक शैक्षणिक साधन निर्मितीत 12 प्रतिकृती व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या 2 प्रतिकृती ठेवण्यात आल्या. तसेच दोन्ही गटात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, वास्तविक जीवनातील प्रश्नांवर वैज्ञानिक उपाय सुचवणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, चालीरीती परंपरा यातील विज्ञान समजून घेणे व विकसित भारत घडवणे हा आहे असे प्रतिपादन केले. या प्रदर्शनात कणकवलीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कणकवलीतील विविध शाळा, शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही बहुसंख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg