loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदोस गावच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही : मंत्री आशिष शेलार

मालवण (प्रतिनिधी) - जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी ‘विरासत से विकास’ असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास पण पहायचा आहे आणि विकास पण पाहायचा असल्याने भकास करणारा विकास न करता समृद्ध करणारा विकास हवा आहे. या भागात समृद्धता येण्यासाठी इतिहास मजबुतीने मांडला गेला पाहिजे. नांदोस गढीचा इतिहास समोर आल्यावर देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येण्यासाठी नांदोस गावच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी येथे बोलताना दिली. मालवण तालुक्यातील नांदोस येथील शिवकालीन गढी पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या भाषणात मंत्री ना. आशिष शेलार म्हणाले, नांदोस व मालवण तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथल्या भूमीत जो इतिहास दडला आहे तो जाणून घेणे आवश्यक आहे. आज महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबईत भूमिगत मेट्रो मार्ग, भूमिगत रस्ते, पाईप लाईन, गटार व्यवस्था अशा अनेक भूमिगत सुविधा उपलब्ध करून मुंबईच्या जमिनीखाली दुसरी एक नवीन मुंबई वसवली जात आहे. असे असताना दुसरीकडे ग्रामीण भागात भूगर्भात दडलेली विरासत, इतिहास शोधण्यासाठी उत्खनन केले जात आहे..असे सांगून ते म्हणाले, नांदोस गढीच्या जतन संवर्धन व उत्खननासाठी पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनाच जाते. ते पुढे म्हणाले, नांदोस गढीच्या संवर्धन कार्यात नांदोस ग्रामस्थांचा आशीर्वाद आवश्यक आहे. कारण इतकी वर्षे नांदोस ग्रामस्थांनीच स्व:मेहनतीने, स्व:कष्टातून गढीचे संवर्धन केले आहे. ग्रामस्थांनी जे कार्य केले तेच आम्हाला पूढे घेऊन जात आहोत, नांदोस गढीचा इतिहास समोर आल्यावर देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येईल, असेही मंत्री शेलार म्हणाले.

टाइम्स स्पेशल

यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, नांदोस येथील गढी उत्खननाचा स्तुत्य उपक्रम मंत्री आशिष शेलार यांनी हाती घेतला आहे आपला इतिहास आपल्याला कळला पाहिजे, त्याचे संकलन झाले पाहिजे, आणि हे काम मंत्री शेलार करू शकतात. कारण ना. शेलार ज्या विषयात हात घालतात तो विषय शेवटपर्यंत घेऊन जातात, असे ते म्हणाले. यावेळी कट्टा येथील वराडकर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. ममता महेश आंगचेकर हिने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तसेच ललित विलास मेस्त्री या विद्यार्थ्यांने लाकडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि नांदोस गढी विषयी ईशा गावडे या विद्यार्थिनी लिहिलेला माहितीपूर्ण लेख असणारा वराडकर हायस्कूल कट्टा यांचा वंदना हा वार्षीकांक कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मंत्री शेलार यांना भेट म्हणून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg