loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

दापोली ( प्रतिनिधी ) : दापोली तालुक्यात मागील चार दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच येथील समुद्र किनाऱ्यावर भटकंती करिता येणाऱ्या पर्यटकांचा ओघ देखील वाढला आहे. अशाच प्रकारे शनिवार रविवारच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुरुड समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक भटकंतीसाठी दाखल झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळ पर्यंतच्या किनारपट्टीवरील जवळपास सर्वच समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांना भावतात. ज्यांना समुद्र दर्शन होत नाही असे लोक पर्यटनासाठी शनिवार तसेच रविवारच्या जोडून आलेल्या सुट्टयांमध्ये येथे येत असतात. त्यात प्रामुख्याने पूणे , पिंपरी चिंचवड,कोल्हापूर , सातारा , सांगली ,सोलापूर आदि ठिकाणी रहाणारे लोक पर्यटनासाठी खास करून समुद्र किनाऱ्यावर नेहमी येत असतात. तसे आज दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर भटकंती करिता पर्यटक मोठ्या प्रमाणात आले होते. साधारणपणे डिसेंबर महिन्यात विशेषतः थर्टी फर्स्ट ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथील समुद्र किनाऱ्यावर येत असतात मात्र यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच पर्यटकांचा येथे येण्याचा सुरू झालेला ओघ हा अजूनही तसाच सुरुच आहे. येथे थर्टी फर्स्ट ला येण्यासाठीचा पर्यटकांचा ओघ सध्या आहे तसाच ठिकून राहील याची खात्री पटल्याने आतापासूनच थर्टी फस्ट, नाताळात होणाऱ्या व्यवसायाची पूर्व तयारी पर्यटक व्यावसायिकांनी सुरू केली आहे.तर दापोलीत आल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आतापासूनच हॉटेल-लॉजचे बुकिंगही पर्यटकांकडून सुरू आहे. पुढील काही दिवसांतच हाॅटेल, लाॅज समोर हाऊसफुल्ल चे फलक लावले जातील असा प्रतिसाद आहे. दापोलीतील समुद्र किनारे जवळून पाहता यावेत म्हणून अनेकांनी बीच लगत असणाऱ्या हॉटेलचे बुकिंगही काही महिने आधीच केले आहे. त्यामुळे सरते वर्ष पर्यटन क्षेत्राला आर्थिक सुबत्ता आणेल असे एकंदरीत चित्र असले तरी तेव्हा गर्दीत आपल्याला हवे तसे वावरताना अथवा मौज घेता येणार नाही या उद्देशाने पंधरा दिवस आधीच दापोलीत जीवाची मौज करण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे.या पर्यटकांच्या गर्दीमुळे पर्यटक व्यवसायिक आपला व्यवसाय होतोय म्हणून चांगलेच सुखावले आहेत.तर मोकळ्या वातावरणातील समुद्र चौपाटीवर हवी तशी मौज करता येत असल्याने येथे आलेले पर्यटक ही समाधानी आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg