loader
Breaking News
Breaking News
Foto

बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक समतेच्या चळवळीची मोठी हानी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर- महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, वंचित आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणून त्यांच्या ज्ञायासाठी अखंडपणे आयुष्य अर्पण करणारे ज्येष्ठ समाजसेवक, सत्यशोधक विचारसरणीचे निष्ठावान अनुयायी व कष्टकर्‍यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या दुखःद निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हमाल पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील हमाल व श्रमीकांना केवळ संघटीत केले एवढेच नाही, तर त्यांना स्वाभीमानाचे भानही दिले. जातीय भेदभाव विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न केला. नव्वदी पार केल्यानंरही, अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक न्यायासाठी आणि श्रमजीवींच्या हक्कांसाठी सक्रियपणे आवाज उठविणारे डॉ. बाबा आढाव कार्याच्या रुपाने कायम महाराष्ट्राच्या मनात राहणार आहेत. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली, असे नामदार श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg