loader
Breaking News
Breaking News
Foto

मानसकोंड येथे वाहनाच्या धडकेने सांबर जखमी; वनविभागाची मदत

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर मौजे मानसकोंड येथे आज सकाळी सुमारे ७.४० वाजता वाहनाच्या धडकेने एक वन्यप्राणी सांबर गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस पाटील माणसकोंड यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संगमेश्वर विभागातील सर्व स्टाफसह घटनास्थळी धाव घेण्यात आली. तपासणीदरम्यान सांबर वाहनाच्या जोरदार धडकेने जखमी झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तत्काळ बचावकार्य हाती घेऊन जखमी सांबराला पुढील उपचारांसाठी देवरुख येथे नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक सक्षम उपचारांसाठी भांबेड (ता. लांजा) येथे हलविण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण कार्यवाही वनपाल संगमेश्वर सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात पार पडली. वन्यप्राण्यांच्या अपघातांच्या घटना आढळल्यास किंवा तत्सम प्रकार आपल्या परिसरात घडल्यास तात्काळ वनविभागाच्या टोलफ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभाग चिपळूण (रत्नागिरी) यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg