loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई–गोवा महामार्गावर महाकाय फांदी कंटेनरवर कोसळून अपघात, चालक थोडक्यात बचावला

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडनजीक नीलकमल हॉटेल शेजारी असणार्‍या एका मोठ्या झाडाची फांदी कंटेनरवर पडून अपघात झाला मात्र सुदैवाने कंटेनरमधील चालक बचावला. कंटेनर चालक आपला कंटेनर क्रमांक एमएच-०६-एक्यू-३८६६ या ठिकाणाहून मुंबई दिशेला जात असताना मागून एक कार या कंटेनरला ओव्हरटेक करत होती त्यामुळे हा कंटेनर झाडाच्या खालून निघाला. ज्या घटनेची भीती होती ती घटना अखेर घडली. ती झाडाची फांदी या कंटेनरमध्ये अडकली आणि तुटली. जवळपास तीन टनाची फांदी २०० मीटर अंतरापर्यंत फरपटत गेली. या घटनेमध्ये कंटेनरची केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र चालक बचावला. मी गेली वर्षभर या मार्गावरून माझा कंटेनर घेऊन जात आहे. या ठिकाणी आल्यानंतर नेहमी सावधगिरी बाळगत असे. आज सकाळी मागून एक कार ओव्हरटेक करत असताना माझा कंटेनर या झाडाखालून गेला आणि जी वर्षभर मला भीती होती तीच घटना अखेर आज घडली असे कंटेनर चालक महमद अन्वर शहा यांनी सांगितले. हीच फांदी एखाद्या का वर पडली असती तर जीवितहानी घडली असती मात्र सुदैवाने ती आज टळली असली तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष देेणे गरजेचे आहे, असे म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg