loader
Breaking News
Breaking News
Foto

खड्डे बुजवा अन्यथा ५ जानेवारीला 'खड्ड्यात उपोषण'; ७ डिसेंबरची मुदत टळल्याने उबाठा सेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

भेडशी प्रतिनिधी: झरेबांबर ते उसप रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला ७ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र या काळात प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (उबाठा) महिला आघाडीने आता आरपारच्या लढाईचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेच्या विरोधात ५ जानेवारी २०२६ रोजी थेट रस्त्यावरील खड्ड्यात बसून उपोषण करण्यात येईल, असा इशारा विनिता घाडी आणि जेनिफर लोबो यांनी तहसीलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झरेबांबर-उसप रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत खड्डे बुजवण्याची मागणी महिला आघाडीने केली होती. अन्यथा ८ डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने या मागणीची कोणतीही दखल घेतली नाही किंवा साधे उत्तरही दिले नाही. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी महिला आघाडीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

टाइम्स स्पेशल

केवळ आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष कृती हवी, या भूमिकेतून आता ५ जानेवारी २०२६ रोजी रस्त्यांच्या खड्ड्यात बसून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. "आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार असेल," असे विनिता घाडी आणि जेनिफर लोबो यांनी निवेदनात ठामपणे नमूद केले आहे. यावेळी महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांच्यासह महिला संघटक जेनिफर लोबो , माटणे विभागाच्या उप तालुका प्रमुख नयनी शेटकर व महिला आघाडीच्या इतर पदाधिकारीही उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg