loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत ५ दुकाने फोडली

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत दोडामार्ग ते साटेली-भेडशी अशा विस्तृत पट्‌ट्यात सलग दुकाने आणि दवाखाना फोडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरटे बिनबोभाटपणे एकामागोमाग एक दुकाने फोडत असताना, दुसरीकडे झरेबांबर येथे एका अल्पवयीन चोरट्याला पकडण्याचे काम पोलिसांऐवजी चक्क सतर्क नागरिकांना करावे लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरट्यांनी दोडामार्ग ते साटेली-भेडशी या मार्गावर नियोजनबद्धरित्या डल्ला मारला. दोडामार्ग बाजारपेठेतील चिकन सेंटर आणि परिसरातील आणखी एक दुकान फोडून चोरट्यांनी आपला मोर्चा पुढे वळवला. त्यानंतर आंबेली येथील गॅरेज आणि साटेली-भेडशी येथील एका दुकानाला व खाजगी क्लिनिकला लक्ष्य करत रोकड व साहित्य लांबवले. झरेबांबर येथे मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. येथे एका कोल्ड्रिंक्सच्या दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिकांनी रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या मुलाला समज देऊन सोडले. मात्र, झरेबांबर येथे पकडलेल्या या चोरट्याचा तालुक्यातील अन्य ठिकाणी झालेल्या चोरीशी काही संबंध आहे का? हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

टाइम्स स्पेशल

एकीकडे नागरिक चोर पकडत आहेत, तर दुसरीकडे चोरटे एकाच रात्रीत अख्खा तालुका पिंजून काढत आहेत. यावरून दोडामार्ग पोलिसांची रात्रगस्त केवळ 'सायरन' वाजवण्यापुरती आणि देखाव्यापुरती उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

झरेबांबरमध्ये अल्पवयीन चोरटा नागरिकांच्या तावडीत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg