loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद पंचायत समिती शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढविणार, गुहागर तालुका कार्यकारणी बैठकीमध्ये निर्णय

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची शनिवारी पार पडलेला बैठकीमध्ये येऊ घातलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागा महाविकास आघाडीतून मिळाल्या नाही तर तालुक्यात स्वतंत्र लढण्याची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेतला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी तालुक्यात घराघरात पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पदमाकर आरेकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील कार्यकारणी सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीतून शरद पवार गटाला किती सीट सुटणार यावर कार्यकर्त्यांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा सर्वांमधून दोन जिल्हा परिषद व 4 पंचायत समिती सीट मागण्या संदर्भात एकमत झाले. अन्यथा शरद पवार गट गुहागर मध्ये स्वतंत्र लढण्याचे ठरवण्यात आले. गुहागर तालुक्यात शरद पवार गटाचे मतदार मोठ्या प्रमाणावर असून ते टीकवून ठेवण्यासाठी तुतारीचे सीट उभे करणे गरजेचे आहे. असे कार्यकर्त्यांनीआपले मत मांडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व पाचही जिल्हापरिषद गटामध्ये जाऊन इतर अनुपस्थित कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्षवाढी संदर्भात नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष व सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेऊन तालुक्यातील परिस्तिथी व विकास कामांबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी गुहागर नगरपंचायत मध्ये आपल्या पक्षाच्या भूमिकेबद्दल अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे प्रामाणिक काम आपल्या पक्षाने केल्याचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष पदमाकर आरेकर, कार्याध्यक्ष आसिम साल्हे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, ओबीसी सेल अध्यक्ष अजित बेलवलकर, शशिकांत पवार, जिल्हा परिषद हा आबलोली गट अध्यक्ष, अल्पसंख्यांक चे दाऊद साल्हे, कुलदीप पवार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg