loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीकांत जोशी यांची १००० किमी. बीआरएम राईड पूर्ण

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूणतर्फे आयोजित १००० किमी बीआरएम राईड यशस्वीपणे पूर्ण करण्याचा मान चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य श्रीकांत जोशी यांनी मिळवला आहे. वयाच्या छप्पनाव्या वर्षी त्यांनी ही आव्हानात्मक स्पर्धा पार पाडली. त्यांच्या समवेत कराड येथील रविराज जाधव व चंद्रजित पाटील यांनीही सहभाग घेतला. ऑडाक्स अंतर्गत २००, ३००, ४००, ६०० आणि १००० किमीच्या बीआरएम राईड्स ठराविक वेळेत पूर्ण कराव्या लागतात. संपूर्णपणे सेल्फ सपोर्टेड असलेल्या या राईड्स रायडरची शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि शिस्त यांची कसोटी पाहतात. १००० किमी साठी ७५ तासांची मर्यादा असते. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विविध बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडर ‘सुपर रँडोनिअर’ किताबासाठी पात्र ठरतो. श्रीकांत जोशी यांनी यापूर्वीच हा किताब पटकावला असून १००० किमी बीआरएम पूर्ण करून त्यांनी आपल्या यादीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जोशी यांनी आपल्या यशाचं श्रेय चिपळूण सायकलिंग क्लबमधील सदस्यांच्या प्रोत्साहनाला दिलं. नोसिल कंपनीमधून निवृत्ती घेतल्यानंतर बागकामासह विविध छंद जोपासताना कोरोनानंतर सायकलिंगची आवड वाढत गेली आणि त्यातूनच या विक्रमाचा प्रवास सुरू झाला.सह्याद्री रँडोनिअर्सने कराड–सोलापूर–अंबेजोगाई–सोलापूर–विजापूर–कराड या मार्गावर बीआरएमचे आयोजन केले होते. रायडर्सच्या सुरक्षिततेपासून आहार, तब्येत व मनोबलापर्यंत बारकाईने लक्ष दिल्याबद्दल आयोजक मनोज भाटवडेकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले. श्रीकांत जोशी यांच्या या कामगिरीबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व घटकांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg